14 Pune police personnel arrested over alleged fake sports certificates saam tv
बिझनेस

पुण्यात १४ पोलिसांसह २५ जणांना अटक, काय आहे प्रकरण? पोलीस दलात खळबळ

Pune Police Recruitment Scam: पुण्यात बनावट कुराश क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याच्या कथित प्रकरणात १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरूय.

Bharat Jadhav

  • सरकारी नोकरी मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे.

  • या प्रकरणात आतापर्यंत २५ जणांना अटक

  • काही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळणाऱ्या पुण्यातील पोलिसांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर पोलीस दलासह राज्यभरात खळबळ उडालीय. कुराश खेळाच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना अटक करण्यात आलीय.

या प्रकरणातील काही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय. आता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे इतर शासकीय विभागात नोकरी मिळवणाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागांशी पुणे पोलिसांकडून पत्रव्यवहार सुरूय.

नेमकं प्रकरण आहे तरी काय

कुराश खेळातील क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करून शासकीय सेवेत प्रवेश मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात स्पर्धांमध्ये सहभाग नसतानाही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्यात आल्याचा संशय तपासातून पुढे आला आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.

या प्रकरणाची व्याप्ती आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या अन्य व्यक्तींचा सहभाग तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कुराश प्रमाणपत्राच्‍या आधारे इतर विभागातही भरती झालेल्‍यांची जी नावे समोर आलीत. त्‍या संबंधीत विभागाला त्‍या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पत्र व्यवहार केला जातोय.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटमधील अनेक धागेदोरे उघड केले आहेत. याप्रकरणी अंकुश नागर, शिवाजी साळुंखे, त्रिवेणी पुनगावकर, धैर्यशील पुनगावकर, श्रुती पुनगावकर, शरद अंदुरे, प्रशांत साळुंखे, कुमार उपाध्याय, दत्तू व्यवहारे आणि चांद शेख यांच्यासह संबंधितांना अटक करण्यात आलीय.

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस भरती होऊन प्रशिक्षणासाठी गेलेल्या प्रकाश सोडनर, समीर गायकवाड, दत्ता सदामते, रोहित गायकवाड, विशाल टेंगळे, रंजित मसलखांब, ऋतुराज पवार आणि अभिजित किन्होळे यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. प्रशिक्षणाला न गेलेल्या, पोलीस दलात भरती झालेल्या प्रथमेश मोरे, ज्ञानेश्वर इंडोळे, चंद्रकांत शिंदे आणि मोहम्मद जाफर फनीबंद यांच्यावरही कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुरेशी झोप घेऊनही सकाळी सतत थकवा आणि आळस जाणवतोय? जाणून घ्या 'ही' महत्त्वाची कारणे

Maharashtra News Live Update : आंध्रप्रदेशात अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढला?

पुण्यात धक्कादायक निकाल! पदवीधरमध्ये मोठा उलटफेर, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित

Mumbai Beach : थंडगार वारा अन् अथांग समुद्रकिनारा, मुंबईच्या गर्दीत लपलेला 'हा' बीच ९९% लोकांना माहितच नसेल, वीकेंड करा प्लान

SCROLL FOR NEXT