Inspirational Story Saam Tv
बिझनेस

Inspirational Story: लेकींसाठी जणू देवदूतच !मुलीच्या जन्मानंतर एकही रुपया फी घेत नाही 'हे' डॉक्टर; आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

Inspirational Story of Pune Doctor Doesn't Charge For Girl Child: पुण्यातील डॉक्टर गणेश राख यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते गेल्या दहा वर्षांपासून लेकीच्या जन्मासाठी एकही रुपया फी चार्ज करत नाही.

Siddhi Hande

पुण्यातील डॉक्टर गणेश राख यांचा खास उपक्रम

लेकीच्या जन्मानंतर घेत नाही एकही रुपया फी

गेल्या १० वर्षांपासून देतायत मोफत सेवा

१००० पेक्षा जास्त मुलींच्या जन्मासाठी घेतली नाही फी

आनंद महिंद्रांकडून कौतुक

प्रत्येकजण आपलं काम खूप मनापासून करत असतात. आपण ज्या फील्डमध्ये काम करत आहोत त्याला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करतात. दरम्यान, सीमेवर लढणारे सैनिक, डॉक्टर किंवा पोलिस हे कोणत्याही देवापेक्षा कमी असतात. डॉक्टरांमुळे हजारो लोकांना जीवनदान मिळते. दरम्यान, पुण्यातील अशाच एका सुपरहिरो डॉक्टरची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुण्यातील डॉक्टरांची अनोखी कामगिरी

पुण्यातील एक डॉक्टर लेकीचा जन्म झाल्यानंतर त्यासाठी एकही रुपया फी चार्ज करत नाही. मुलींसाठी केलेल्या या उत्तम कामगिरीमुळे डॉक्टरांचं खूप कौतुक होत आहे. डॉ, गणेश राख असं त्यांचं नाव आहे. ते गेल्या अनेक दिवसापासून मुलीचा जन्म झाल्यानंतर कोणतीही फी घेत नाही. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीदेखील डॉ. गणेश राख यांचं कौतुक केलं आहे.

लेकीच्या जन्मानंतर घेत नाही एकही रुपया फी

आनंद महिंद्रा यांनी डी. प्रशांत नायर यांची एक पोस्ट रिशेअर केली आहे. त्यात म्हटलंय की, एका कामगाराने आपल्या बायकोला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. बायकोच्या सिझेरियनसाठी खर्च भागवण्यासाठी त्याने घर गहाण ठेवलं.बाळाच्या जन्मानंतर मुलगा की मुलगं असं त्यानं विचारलं. त्यावेळी मुलगी झालं असं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर त्या व्यक्तीने डॉक्टरांना फीबद्दल विचारले. तेव्हा डॉ. गणेश राख म्हणाले की, जेव्हा एजंल जन्माला येतात तेव्हा मी फी घेत नाही.डॉक्टरांचे हे वाक्य ऐकून त्या मूलीचे वडील भारावून गेले आणि डॉक्टरांच्या पाया पडू लागले.

१,००० हून अधिक बाळांच्या प्रसूतीसाठी फी नाही

पुण्यातील डॉक्टर गणेश राख हे गेल्या १० वर्षांपासून मुलगी जन्माला आल्यावर शुल्क आकारत नाही. डॉक्टर गणेश यांनी सेव्ह द गर्ल्ड चाइल्ड उपक्रमाने जागतिक स्तरावर बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत त्यांनी १००० पेक्षा जास्त बाळांना मोफत जन्म दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar on High Alert : हायअलर्ट ! नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी, नावं आणि फोटोही केले शेअर

Zp School : शिक्षक नसल्याने शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; शिक्षकांची चार पदे रिक्त

Genelia Deshmukh: याच नजरेत वेडा झाला रितेश देशमुख

Cyber Crime : CBI अधिकारी बोलतोय..., गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली, आजोंबांना १ कोटींचा गंडा

आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT