PM Life Insurance Scheme Saam Tv
बिझनेस

PM Life Insurance Scheme: वर्षाला ४३६ रुपये भरा, मिळवा २ लाखांचा विमा, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Prime Minister Life Insurance Scheme: वयाची १८ वर्ष पार केलेल्या व्यक्तीला सरकारच्या एका विमा योजनेचा लाभ घेता येतो. ही योजना काय आहे, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अल्प दरात २ लाख रुपयांचा विमा मिळवून देण्यासाठी एक योजना सुरू केलीय. ही विमा योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना. यात विमा योजनेच्या लाभ १८ ते ५० वय वर्ष असलेली व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेचा हप्ता हा वार्षिक आहे, तोही अल्प दरात आहे. वर्षाला फक्त ४३६ रुपये भरावे लागतात आणि हा हप्ता बँकेतून कापला जातो. या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी अर्ज भरावा लागेल. हा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन ,अशा दोन्ही पद्धतीने भरता येईल.

PMJJBY एक वार्षिक जीवन विमा योजना आहे, ज्याचा कव्हर एक वर्षासाठी असतो . याला दरवर्षी नूतनीकरण करू शकता. या योजनेअंतर्गत १ वर्षासाठी २ लाख रुपयांचा विमा कव्हर दिला जातो. प्रत्येक वर्षी हफ्ता भरून योजना रिन्यू केली जाऊ शकते.

विमा घेणाऱ्या व्यक्तीचा जर कोणत्या कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना २ लाख रुपये मिळतात. या विम्याचा लाभ घ्यायचा असेल वर्षाला ४३६ रुपयांता हप्ता भरावा लागेल. हा हप्ता ते नियमितपणे कट होतो त्यामुळे हप्ता चूकण्याची भीती नसते.

विम्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. ऑफलाईन पद्धतीनेही योजनेसाठी अर्ज करता येईल. यासाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तु्म्ही अर्ज करू शकतात. तुमच्या बँक खात्याद्वारे ऑटो डेबिट पद्धतीने प्रीमियम कापला जातो. विमा काढण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील आवश्यक असतो. योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचे वैशिष्ट्य

ही एक वर्षाची नूतनीकरणीय मुदत विमा योजना आहे.

ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट स्कीम आहे.

या योजनेत वैद्यकीय तपासणीची गरज नसते.

भरलेला प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र आहे.

वार्षिक प्रीमियम भरल्यावर PMJJBY अंतर्गत कव्हरेज 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी एक वर्षासाठी वैध असतं.

PMJJBY भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यू झाला तरी ते कव्हर केलं जातं.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते. ही एक जीवन विमा योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी कोलकाता येथे सुरू केली होती.

या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फॉर्म भरून अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांनंतर विमा कंपनीकडून प्रीमियम सुरू केला जाईल. विमाधारकाची प्रीमियम रक्कम निश्चित तारखेला त्याच्या/तिच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT