Apply For 5 Lakh Free Insurance 
बिझनेस

PMJAY Scheme: 5 लाख रुपयांचा विमा मोफत कसा मिळणार? जाणून सर्व प्रक्रिया

Apply For 5 Lakh Free Insurance: कुटुंबासाठी प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा उपलब्ध या योजनेतून मिळत असतो. यासाठी सरकारी योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. चला जाणून घेऊया योजना काय आहे आणि मोफत विम्यासाठी अर्ज कसा करावा?

Bharat Jadhav

PMJAY Scheme 5 Lakh Free Insurance: आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत असतो. ही योजना देशातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आहे. ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील रांचीपासून सुरू करत आली होती.

ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेचं उद्दिष्ट 12 कोटींहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना म्हणजे सुमारे 55 कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवणं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेंतर्गत लाभार्थीला कॅशलेस उपचार मिळतात.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांचा खर्च या योजनेत समाविष्ट केला जातो.नुकतेच आयुर्वेद दिनानिमित्त ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) ची अधिकृत वेबसाइट nha.gov.in वर जावे. होमपेजवर PMJAY फॉर 70 + आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा पेज उघडेल. तेव्हा तुम्ही लिस्ट ऑफ पॅनेल केलेल्या हॉस्पिटल्सच्या चिन्हावर क्लिक केल्यास तुम्हाला हॉस्पिटलची संपूर्ण यादी दिसेल.

आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे

योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड बनवा आणि ते आधार कार्डशी लिंक करा. आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आरोग्य केंद्र किंवा सार्वजनिक सेवा केंद्रात जा. येथे अर्ज भरा आणि आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सबमिट करा. कागदपत्रे तपासल्यानंतर संबंधित अधिकारी आयुष्मान कार्ड बनवून देईल.

ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक NHA वेबसाइट किंवा आयुष्मान ॲपद्वारे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) च्या अधिकृत वेबसाइट nha.gov.in वर लॉग इन करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी भरून पडताळणी करावी.

पेज उघडल्यानंतर PMJAY फॉर 70+ आयकॉनवर क्लिक करत राज्य, जिल्ह्याचे नाव आणि आधारकार्ड नंबर त्यात भरावे. आधारकार्डमध्ये नोंदणी ओटीपी नंबरने केवायसी पूर्ण करावी. त्यानंतर नवा फोटो अपलोड करा. पंधरा मिनिटाच्या वेळानंतर डिस्प्ले ते दिसून लागेल. त्यानंतर डाऊनलोड करून त्याची प्रिन्ट काढून घ्यावी. गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा. आधार कार्ड क्रमांक आणि फोटो अपलोड करून KYC अपडेट करा. आयुष्मान कार्ड दाखवले जाईल. तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सेव्ह करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Tourism: पार्टनरसोबत फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT