PPF Scheme Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: महिन्याला १२५०० रुपये गुंतवा अन् ४० लाख मिळवा; या सरकारी योजनेत मिळणार जबरदस्त परतावा

Public Provident Fund: पब्लिक प्रोव्हिडंट फंडमधील गुंतवणूकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही १२५०० रुपये गुंतवून ४० लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

सरकारने बचत योजनांवरील व्यादरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्याजदर हे मागच्या वर्षाप्रमाणेच असणार आहे. बचत योजनांवरील व्याजदर हे तिमाही आधारावर ठरवले जाते. यामध्ये पीपीएफ योजनेचा समावेश आहे. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. पीपीएफ योजना हा गुंतवणूकीसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

दर महिन्याला १२५०० रुपयांची गुंतवणूक

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही टॅक्स डिडक्शनसाठी क्लेम करु शकतात. जे करदाते जुन्या करप्रणालीचा स्वीकार करतात त्यांना याचा फायदा होतो. तसेच पीपीएफमध्ये १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिट मिळते. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला १२,५०० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही डिडक्शनसाठी क्लेम करु शकतात.

पीपीएफ योजनेत दर महिन्याला १२५०० रुपये गुंतवणूक करायची आहे. तुम्हाला १५ वर्षात ४०.६ लाख रुपयांचा फंड मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला EEE टॅक्स बेनिफिटचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. यामध्ये व्याजदरावर कोणताही टॅक्स लागत नाही.

जर तुम्हाला सुरक्षित परतावा हवा असेल तर ही योजना बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सध्या परतावा स्थिर आहे.परंतु हा व्याजदर वाढतो.

१५ वर्षात जबरदस्त परतावा (Interest Rate)

पीपीएफ योजनेत १५ वर्षानंतर तुमचा फंड मॅच्युअर होतो. त्यामुळे तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. पीपीएफ खात्यावर शेअर मार्केटचा जास्त परिणाम होत नाही.त्यामुळे तुमचे पैसे हे सुरक्षित असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT