PPF Scheme Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

Public Provident Fund Scheme Investment: तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ४१.३५ लाख रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

सरकारी योजनांमधील गुंतवणूक फायद्याची

पीपीएफ योजनेत मिळतंय सर्वाधिक व्याजदर

दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख रुपये मिळवा

प्रत्येकाने आपल्या भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच काही पैसे बाजूला काढून ठेवायला हवेत. हे पैसे एखाद्या योजने, एसआयपी किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवायला हवे. जर तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. याचसोबत तुमची गुंतवणूक ही सुरक्षित असणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पीपीएफ, सुकन्या समृद्धी, सिनियर सिटीजन या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनांमध्ये तिमाही आधारावर व्याजदर निश्चित केले जाते.

दर महिन्याला मिळणार भरघोस व्याजदर

सरकारने नुकतेच या योजनांवरील तिमाही व्याजदर जाहीर केले आहे. या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, या योजनांमधील गुंतवणूकीवर सरकार स्वतः तुम्हाला गॅरंटी देते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरावीक रक्कमदेखील मिळू शकते. तुम्हाला पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund)

तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगले व्याजदर मिळणार आहे. या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो. तुम्ही या योजनेत ५-५ वर्षांसाठी दोनदा कालावधी वाढवू शकतात. या योजनेत तुम्ही वर्षाला कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला १५ वर्षानंतर चांगला परतावा मिळणार आहे.

पीपीएफ योजनेत जर तुम्हाला वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवायचे म्हणजे महिन्याला १२,५०० रुपये गुंतवायचे आहेत. महिन्याला जर १२,५०० रुपये गुंतवायचे म्हणजे दिवसाला ४१६ रुपये गुंतवायचे आहे. या योजनेत तुम्हाला ७.१ व्याजदरानुसार ४१.३५ लाख रुपये मिळणार आहेत. यातील २२.५० लाख रुपये तुम्ही गुंतवणार आहात तर व्याज १८.८५ लाख रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

SCROLL FOR NEXT