Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज मिळते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही २ लाख रुपये फक्त व्याजातूनच कमवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर भरघोस परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यानंतर चांगले व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. (Post Office Time Deposit Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोक अर्ज करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते. त्यामुळे गुंतवणूक आणि व्याजदर मिळून मॅच्युरिटीनंतर चांगली रक्कम मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. १ वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर ६.९ टक्के व्याज मिळते. २ ते ३ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर ७ टक्के व्याजदर मिळते. ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर ७.५ टक्के व्याजदर मिळते. (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जर ५ वर्षांसाठी ५ लाखांची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. या कालावधीत तुम्हाला २,२४,९७४ रुपये फक्त व्याज मिळते. तुम्हाला मॅच्युरिटीनंतर ७,२४,९७४ रुपये मिळतात. त्यामुळे फक्त व्याजातूनच तुम्हाला दोन लाख रुपये मिळतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. या योजनेत १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या काळ्या गाजराचा रस, घरी कसा बनवायचा? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: बदलापूर पूर्वमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

SCROLL FOR NEXT