Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत फक्त व्याजातून तुम्ही २ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी योजनांमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि अधिक परतावा मिळवून देते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला खूप परतावा मिळतो. या योजनेत फक्त व्याजातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. (Post Office Time Deposit)

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही योजना सर्वांसाठी लागू आहे. महिला, लहान मुले आणि तरुणांसाठी ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूकवर चांगले रिटर्न मिळतात. याचसोबत टॅक्सपासून सूटदेखील मिळते. या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. १ वर्ष, २, ३ आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात.या योजनेत एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर ६.९ टक्के व्याज मिळते. २,३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के व्याजदर मिळते. ५ वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक केली तर ७.५ टक्के पूर्ण व्याज मिळते. (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही फक्त व्याजातूनच २ लाख रुपये मिळवू शकतात. तुम्हाला या योजनेत ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवायचे आहेत. त्यात तुम्हाला २,२४,९२४ रुपये व्याज मिळणार आहे. त्यामुळे पाच वर्षानंतर तुम्हाला ७,२४,९७४ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही फक्त व्याजातून २ लाख रुपये कमवू शकतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळणार आहे. या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकतात. तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांचेही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत वार्षिक व्याजदर मिळते.जेवढे जास्त पैसे तुम्ही गुंतवणार तेवढे जास्त व्याज तुम्हाला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Garib Rath Express : ब्रेकिंग न्यूज! गरीब रथ ट्रेनच्या ३ एसी बोगीला भयंकर आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT