Post Office Time Deposit  google
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Post Office FD Interest Rate : पोस्टाच्या ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिट योजनेत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळतं. ५ लाख रुपयांची गुंतवणूक मुदतवाढीच्या सुविधेसह १५ वर्षांत सुमारे १५.२४ लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकालाच भविष्यासाठी काही पैसे जमा करायचे असतात. त्यामुळे पगारातला काही भाग लोक गुंतवतात. पण त्यासाठी योग्य जागा असावी लागते जिथे तुम्हाला गुंतवणूकीतून जास्त परतावा मिळू शकतो. तर पोस्टाची पुढील योजना तुमच्यासाठी खास ठरू शकते. कारण यामध्ये तुम्हाला ५ वर्षात जबरदस्त परतावा मिळू शकतो.

खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना नेहमीच उपयोगी ठरल्या आहेत. बँक एफडीप्रमाणेच पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) योजना देखील गुंतवणूकदारांना हमखास परतावा देते. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी देऊ शकते.

सध्या पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर वार्षिक ७.५ टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम मुदतपूर्तीनंतर पुन्हा वाढवून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. याच सुविधेचा योग्य वापर केल्याने गुंतवणूकदारांना मूळ रकमेपेक्षा दुप्पटपेक्षा जास्त व्याज मिळू शकतं.

समजा, तुम्ही ५ लाख रुपये ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानुसार त्याला पहिल्या पाच वर्षांत २.२५ लाख रुपयांचे व्याज मिळेल. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळेस एकूण रक्कम सुमारे ७.२५ लाख रुपये होईल. त्यानंतर हीच ठेव आणखी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर १० वर्षांच्या कालावधीनंतर एकूण रक्कम १०.५१ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

योजनेचा लाभ जास्त वाढवण्यासाठी ठेव तिसऱ्यांदा म्हणजेच आणखी ५ वर्षांसाठी वाढवली तर १५ वर्षांनंतर गुंतवणूकदाराला एकूण १५.२४ लाख रुपये मिळू शकतात. यामध्ये फक्त व्याजातूनच १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होते. म्हणजेच ५ लाख रुपयांची गुंतवणूक तब्बल तिप्पट होण्याची शक्यता निर्माण होते.

पोस्ट ऑफिसच्या नियमानुसार ३ आणि ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटला मुदतपूर्तीनंतर १८ महिन्यांच्या आत मुदतवाढ देता येते. तसेच खाते उघडतानाच मुदतवाढीची विनंती नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. सध्या १ वर्षांच्या एफडीवर ६.९० टक्के, २ वर्षांवर ७.०० टक्के, ३ वर्षांवर ७.१० टक्के आणि ५ वर्षांवर ७.५० टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. त्यामुळे दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा बेस्ट ऑप्शन मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT