Sakshi Sunil Jadhav
किडनी निकामी होण्यामागे तुमची रोजची जीवनशैली कारणीभूत असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे भविष्यात मोठ्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
तज्ज्ञांच्या मते, किडनी खराब होण्याआधी सकाळी तुम्हाला काही गंभीर लक्षणं जाणवू शकतात. जर तुम्हाला याची लक्षणे जाणवत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातले जास्तीचे पाणी आणि सोडियम बाहेर पडत नाही. त्यामुळे डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर सकाळी सूज दिसू शकते.
किडनीचे कार्य कमी झालं असेल तर शरीरात विषारी द्रव्ये साचायला सुरुवात होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी मळमळ, उलटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
सकाळच्या पहिल्या लघवीकडे विशेष लक्ष द्या. लघवीत जास्त फेस येणे, रंग गडद होणे किंवा रक्त दिसणे हे किडनीच्या समस्यांचे संकेत असू शकतात.
रात्रभर शरीरात द्रव साचल्यामुळे डोळ्यांखाली सूज दिसू शकते. या किडनीच्या कार्यक्षमतेत काही बिघाड झाल्याचा इशारा असू शकतो.
किडनी स्टोन किंवा किडनी इन्फेक्शनमुळे कमरेच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. सकाळी उठल्यानंतर ही वेदना जास्त जाणवू शकते.
किडनी खराब झाल्यावर रक्तातले अशुद्ध पदार्थ वाढतात. त्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
शरीरात विषारी घटक साचल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे सकाळी भूक न लागणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे दिसून येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.