Sukanya Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी बचत केली जाते. सुकन्या समृद्धी योजना ही २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी बचत करण्यास मदत केली जाते. मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा आर्थिक भार कमी करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत करात सूट आणि भरघोस परतावा दिला जातो. सुकन्या समृद्धी योजनेत १० वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावाने खाते उघडले जाते. या योजनेत मुलींसाठी किमान २५० रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमाल गुंतवणूक १.५ रुपयांची गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजना आयकर कायदा १९६१ च्या कलम 80c अंतर्गत सवलत दिली जाते. (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेत सरकार तिमाही आधारवर व्याज निश्चित केले जाते. या तिमाहीत १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ कालावधीत ८.२ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहे.

जर तुमची मुलगी ५ वर्षांची असेल तर तुम्ही वर्षाला १.२ लाख रुपये गुंतवणू शकतात. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवावे लागेल.या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर मुलींना ५५.६१ लाख रुपये असेल. ज्यामध्ये १७.९३ लाख गुंतवणूक असेल आणि ३८.६८ लाख रुपये व्याजदर असेल. दरम्यान जर तुम्ही वर्षाला १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला २१ वर्षानंतर ६९.८ लाख रुपये मिळतील. (Sukanya Samrudhhi Yojana For Girls)

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची योजना आहे. या योजनेत जर मुलगी ५ वर्षांची असताना खाते उघडले तर तुमची मुलगी २६ वर्षांची झाल्यानंतर मॅच्युअर होते. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT