Post Office Recurring Deposit Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना; ५ हजार रुपये गुंतवा अन् लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट ही पोस्ट ऑफिसची खास योजना आहे. या योजनेतून नागरिकांना भरघोस परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. यासाठी बँकेत एफडी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. परंतु पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. ज्यात तुम्हाला भरघोस व्याज मिळते. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही काही वर्षांत लखपती होऊ शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतवावी लागते. यामध्ये तुम्ही १० वर्षांत ८ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्ष आहे. हा कालावधी तुम्ही १० वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिजॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकतात. यामध्ये तुम्ही फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणुकीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांना काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये तुम्हाला ६.५ ते ६.७ टक्के व्याजर मिळणार आहे. यामध्ये १०० रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करु शकतात. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर ५ वर्षात तुमचे तुमचे ३ लाख रुपये जमा होतील. त्यावर ६.७ व्याजदर देण्यात येणार आहे, त्यानुसार तुम्हाला ३,५६,८३० रुपये होईल. त्यानंतर १० वर्ष अशीच गुंतवणूक केली तर तुम्हाला ८,५४,२७२ रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT