आपल्याला प्रत्येकाला भविष्याची काळजी असते. आपले भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी थोड्या मोठ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. तुम्ही एकाच चांगल्या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. याचसोबत महिन्याला ठरावीक रक्कमदेखील मिळेल.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत ५००० रुपये दर महिन्याला गुंतवले तर तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही सोप्या पद्धतीने गुंतवणूक करु शकतात. (Post Office Scheme)
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना २०२३ मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील व्याजदर बदलत असते. या योजनेत ६.७ टक्के व्याज मिळते. या योजनेतील व्याजदर वाढूदेखील शकते.
या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर ८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत मॅच्युरिची कालावधी पाच वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही ३ लाख रुपये जमा करणार आहेत. त्यात ६.७ टक्के व्याजदर पकडले तर ५६,८३० रुपये मिळणार आहे. म्हणून एकूण तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळणार आहेत. (Post Office Recurring Deposite)
या योजनेत जर तुम्ही अजून पाच वर्ष गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही १० वर्षासाठी ६ लाख रुपये गुंतवणार आहेत. यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळणार आहेत. या योजनेत १० वर्षांनी तुमचे ८,५४,२७२ रुपये मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.