Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Post Office Scheme NSC Scheme: प्रत्येकजण भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ३६ लाख रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनांमध्ये तुम्ही टेन्शन फ्री गुंतवणूक करु शकतात. कारण या योजनांवरील परताव्याची सरकार स्वतः गॅरंटी देते.प्रत्येकाने भविष्यासाछी गुंतवणूक करावी, या उद्देशातून अशा योजना राबवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन त्यांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. (Post Office NSC Scheme)

पोस्ट ऑफिसची योजना (Post Office Scheme)

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत (NSC) गुंतवणूक करतात. ही योजना पोस्टाद्वारे चालवली जाते. या योजनेत तुम्हाला गॅरंटीज रिटर्न मिळते.या योजनेत सरकार आकर्षक व्याजदर देते.

सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तिमाही आधारावर व्याजदर दिले जाते. सध्या ७.७ टक्के व्याद दिले जाते. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते.

या योजनेत ५ वर्षांचा लॉक इन पीरियड आहे. या योजनेत गुंतवणूक ही पूर्णपणे सुरुक्षित असणार आहे. यात कोणत्याही प्रकारची रिस्क नाही.

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही १००० रुपये भरुन अकाउंट उघडू शकतात. तसेच जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतात. यासाठी कोणतीही लिमिट नाही आहे.

या योजनेत जर १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचे अकाउंट उघडले तर ते १८ वर्षानंतर मॅच्युअर होते. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात.

पोस्टाच्या या योजनेत जर तुम्ही २५ लाख रुपये गुंतवले तर ७.७ टक्के चक्रव्याढ व्याज मिळते. त्यामुळे ५ वर्षात तुम्हाला ३६,४७,५८२ रुपये मिळणार आहे. यामध्ये फक्त व्याजातूनच तुम्हाला ११,४७,५८२ रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही वित्तीय संस्थेतून लोन घेऊ शकतात.या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट दोन्ही अकाउंट उघडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT