Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Post Office Monthly Saving Scheme: प्रत्येकजण आपल्या भविष्याच्यादृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेकजण सरकारी योजना किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. या योजनेअंतर्गत तुम्हाला चांगले व्याज मिळते. (Post Office Monthly Scheme)

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत कमीत कमी १,००० रुपये गुंतवावे लागतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकतात.तसेच तुम्ही जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये डिपॉझिट ककु शकतात. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

सरकार या योजनेत अनेकदा व्याजदर बदलते. या योजनेत सध्या व्याजदर ७.४ टक्के आहे. या योजनेत अल्पवयीन वयोगटातील व्यक्तीदेखील अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तीन लोक मिळून जॉइंट अकाउंट ओपन करु शकतात. (Post Office Monthly Scheme News)

या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुमची दर महिन्याला ५,५५० रुपयांची इन्म होईल. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये डिपॉझिटची परवानगी आहे. या योजनेत दर महिन्याला तुम्हाला ९,२५० रुपये मिळू शकतात. या योजनेत ५ वर्षांसाठी मिळणारा परतावा फिक्स्ड असतो. या योजनेत जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हो मर्यादेपेक्षा जास्त आहे तर त्यांना योजनेतील व्याजावर कर भरावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल तर ते कर उत्पन्न कक्षेत येणार नाही.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत तुम्हाला काही कारणास्तव पैसे काढायचे असतील तर एका वर्षानंतरच काढू शकतात. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही १ ते ३ वर्षात पैसे काढले तर तुमच्या गुंतवणूकीमधील २ टक्के रक्कम कापली जाईल. जर तुम्ही ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर पैसे काढले तर तुमची फक्त १ टक्के रक्कम कापली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT