पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये एकदाच गुंतवणूक करता येते
५ वर्षांनंतर मूळ रक्कम परत मिळते
पोस्टाच्या खात्यात गुंतवणूक केल्यावर महिन्याला सुमारे ₹९२५० उत्पन्न मिळेल
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेक सवयींमध्ये बदल होताना दिसत आहेत. तुम्हालाही या काळात बचत करणं कठीण होत असेल. बऱ्याचणांना असं वाटतं की, आपली रक्कम डबल होणार नाही. त्यामुळे ती खर्चून घ्यावी. पण पोस्टाकडे (Post Office)अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवून अनेक काळासाठी फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या भन्नाट योजनेबद्दल.
पोस्टाच्या या सरकारच्या योजनेत तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ९,२२० रुपये मिळतील. सर्वात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही गुंतवलेली मुद्दल तुम्हाला ५ वर्षांनंतर मॅच्युरिटी झाल्यावर काढता येते. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) आहे. यामध्ये तुम्हाला महिन्याला परतावा मिळवून देते. शिवाय यात तुमची गुंतवणूक सुरक्षितपणे राहते.
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीमची मॅच्युरिटी ५ वर्षांनी होते आणि एक वर्षानंतर पैसे काढण्याचा पर्यायही यामध्ये तुम्हाला मिळतो. यात तुमची मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला पूर्ण पैसेही काढता येतात. तर या योजनेत तुम्ही ९ लाखांपर्यंत गुतंवणूक करु शकता. यात अल्पवयीन मुलांच्या नावानेही खातं उघडता येतं.
यामध्ये तुम्ही ९ लाख रुपये गुंतवले असतील तर ५ वर्षांसाठी महिन्याला ५,५५० रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजेच वर्षाला तुम्हाला ६६,६०० रुपये परतावा मिळेल. जर तीन लोकांनी मिळून १५ लाख गुतंवले तर महिन्याचे ९,२५० रुपयांनी १५ लाख पर्यंत रक्कम तुम्हाला मिळते. तसेच याचं व्याज महिन्याला तुमच्या बॅंकेच्या खात्यात जमा केलं जातं. ही गुंतवणूक भविष्यासाठी खूप महत्वाची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.