Dahi Kachori Recipe: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

दह्याचा वापर

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामध्ये घरात दही खाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचाच एक भन्नाट नाश्ता तुम्ही बनवू शकता.

Khasta Kachori Crispy

चटपटीत कचोरी रेसिपी

पुढे आपण चटपटीत दही कचोरी कशी बनवायची याबद्दल जाणून घेणार आहोत.

breakfast recipes indian

साहित्य

१ कप रवा, १ चमचा लाल मिरचीचे तुकडे, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ इ.

breakfast recipes indian

स्टफिंगचे साहित्य

१ कप घट्ट दही, ५० ग्रॅम पनीर, १ चमचा चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा लाल मिरचीचे तुकडे, १ बारीक चिरलेला कांदा, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि २ चमचे कॉर्न फ्लोअर इ.

breakfast recipes indian

स्टेप १

सर्वप्रथम पीठ मळून घ्या. त्यासाठी १ कप पाण्यात थोडे मीठ, लाल मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि तूप घालून उकळवा. मग त्यात रवा घाला.

street food

स्टेप २

पाण्यात गाठी होऊ नयेत म्हणून मिश्रण ढवळत राहा. गॅस स्लोच ठेवा.

street food

स्टेप ३

मग गॅस बंद केल्यावर तयार पीठ १० मिनिटांसाठी झाकून ठेवा. मग रवा ५-६ मिनिटे चांगला मळून घ्या. मग त्याचा चिकटपणा कमी होईल.

Rava Kachori

स्टेप ४

आता सारणासाठी एका भांड्यामध्ये घट्ट दही घ्या. त्यात किसलेलं चीज, हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लोअर, लाल मिरचीचे तुकडे, मीठ, कांदा, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

Rava Kachori

स्टेप ५

आता पिठाचे चपटे भाग करुन त्यामध्ये सारण भरा. मग हलक्या कचोरी बंद करा. आणि इडलीच्या किंवा अप्प्यांच्या पॅनमध्ये ठेवा.

Rava Kachori

स्टेप ६

शेवटी कुरकुरीत झालेल्या कचोरीमध्ये आतून सारण भरा. गोड आणि हिरवी चटणीसोबत स्वादिष्ठ घरगुती कचोरी सर्व्ह करा.

Dahi Kachori Recipe

NEXT: सकाळी पोट साफ होण्यासाठी पाण्यामध्ये मिसळा हा पदार्थ, गॅस अन् अपचानाच्या समस्या होतील दूर

digestion improvement tips
येथे क्लिक करा