Post Office Gram Suraksha Yojana Saam Tv
बिझनेस

Post Office Gram Suraksha Yojana: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ५० रुपये गुंतवा अन् ३५ लाख मिळवा

Post Office Gram Suraksha Yojana: पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. रोज जर तुम्ही फक्त ५० रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर ३५ लाख रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्याची काळजी करतो. नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच सेवानिवृत्तीनंतर एक ठरावीक रक्कम आपल्या भविष्यासाठी गुंतवायची असते. परंतु ही रक्कम कुठे गुंतवायची, कोणत्या योजनेतून आपल्या चांगला आणि सुरक्षित परतावा मिळेल असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. सुरक्षित परताव्यासाठी तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक करा. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही गुंतवणूक करु शकतात..

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana)

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही सुरक्षित आहे. या योजनेत तुम्हाला रोज फक्त ५० रुपयांची बचत करायची आहे.या योजनेत तुम्ही ३५ लाख रुपये मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसने ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना सुरु केली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही रिस्क नसते. तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात.

ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही ३५ लाखांपर्यंत पैसे मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला वयाच्या ८०व्या वर्षी सर्व रक्कम मिळते. या योजनेत बोनसदेखील मिळतो. या योजनेत जर गुंतवणूकदाराचा ८० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.

पात्रता

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत १९ ते ५५ वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. यामध्ये तुम्ही १०,००० ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर तुम्ही हे पैसे भरु शकतात.

या योजनेत गुंतवणूकदाराला चार वर्षांनी कर्ज घेण्याचीदेखील सुविधा मिळते. या योजनेत पॉलिसीधारकाला जर पॉलिसी परत करायची असेल तर तीन वर्षांच्या आत परत करु शकतात.

कॅलक्युलेशन

या योजनेत जर तुम्ही दररोज ५० रुपये जमा केले तर महिन्याला १५०० रुपये जमा कराल. दरम्यान, यानंतर तुम्हाला ३५ लाख रुपये मिळू शकतात. तुम्हाला ५५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर ३३,४०,००० रुपये मिळू शकता. तर ६० वर्षानंतर ३४.७० लाख रुपये मिळू शकतात. ८० वय पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT