स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन हँडसेट लॉन्च करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे याच्या लॉन्चिंगची तारीख देखील जाहीर केली आहे. लॉन्च होण्याआधीच या फोनचे अनेक रेंडर्स समोर आले आहेत. त्यामुळे त्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दलही माहिती समोर आली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, POCO चा हा नवीन फोन 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सादर केला जाईल. यासोबतच हा फोन फ्लिपकार्टवर ऑनलाइन उपलब्ध करून दिला जाईल, असा खुलासाही कंपनीने केला आहे. यासाठी एक मायक्रोसाइटही तयार करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फ्लिपकार्ट मायक्रोसाइट वरून असं दिसून आलं आहे की, POCO C61 मध्ये 90Hz HD+ डिस्प्ले, 6GB RAM आणि 6GB व्हर्च्युअल रॅम असेल. याशिवाय यात ग्राहकांना 5,000mAh ची बॅटरी मिळेल. टीझरनुसार, इतर पर्यायांसह हा फोन ब्लॅक रंगात उपलब्ध होईल. (Latest Marathi News)
Appuals च्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये असू शकते. तर याच्या 6GB + 128 GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 8,499 रुपये असू शकते. असं असलं तरी कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ड्युअल कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असू शकतो. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 5000mAh दिली जाऊ शकते. ज्यामध्ये 10W चार्जर दिला जाऊ शकतो. जो Type-C पोर्टसह येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.