Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: व्यवसाय सुरु करा, कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांचे कर्ज; पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?

PM Vishwakarma Yojana For Business: केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना ३ लाखांपर्यंत लोन मिळते. या योजनेत कुशल कारागिरांना लोन मिळते.

Siddhi Hande

अनेक तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो. परंतु भांडवल नसल्याने व्यवसाय सुरु करता येत नाही. त्याचसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबवली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत मिळते. १५,००० रुपयांपर्यंत मदत सरकारकडून केली जाते.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सोनार,लोहार, न्हावी यांसारखी कौशल्य असणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. १८ ट्रेडमधील कुशल व्यापारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार, गवंडी या लोकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे मिळणार आहे.

पीएम विश्वकर्मायोजनेअंतर्गत ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात १ लाखांचे कर्ज दिले जाते. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाखांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज ५ टक्के व्याजाने दिले जाते.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत १८ ट्रेडमधील लोकांना मास्टर ट्रेनर्सद्वारे प्रशिक्षणदेखील दिले जाते. याचसोबत रोज ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.या योजनेत कौशल्य अपग्रेड, १५,००० रुपयांचे टूलकिट आणि डिजिटल व्यव्हारांसाठी प्रोत्साहन दिले जाते. (PM Vishwakarma Yojana)

या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. अर्जदाराचे वय १८ पेक्षा जास्त असावे. तसेच त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र असावे. योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (How To Apply For Pm Vishwakarma Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

SCROLL FOR NEXT