PM Ujjwala Yojana google
बिझनेस

Ujjwala LPG Cylinders: मोठी बातमी! उज्ज्वला योजनेचे नियम बदलले, वर्षभरात किती सिलिंडर मिळणार, लगेचच घ्या जाणून

LPG Subsidy Reduction : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. आता वर्षाला ९ मिळणारे सिलेंडर आणखी कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्जवला योजनेचा (PMUY) लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये सरकारने नवा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सिलेंडरची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या LPG च्या किंमतींमुळे आणि सबसिडीवरील खर्चामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सरकारने सांगितलं आहे. नेमका काय बदल झालाय हे पुढील माहितीत सांगण्यात आले आहे.

तुम्ही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) लाभ घते असाल तर तुम्हाला सिलेंडर कमी मिळतील. आधी ९ सिलेंडर दिले जायचे आता ही संख्या ४ वर आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठी काटकसर करावी लागू शकते. सरकारने यामागचं कारण सुद्धा स्पष्ट केलं आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात मे २०१६ मध्ये झाली होती. या योजनेमध्ये सुरुवातीला लाभार्थ्यांना वर्षाला १२ सबसिडी गॅस सिलिंडर देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर ही संख्या कमी करून ९ करावी लागली. आता पुन्हा एकदा कपात करत ती फक्त ४ सिलिंडरपर्यंत आणण्यात आली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव प्रवीण मल खनूजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थी कुटुंबांच्या वार्षिक गॅस वापराचा विचार करून ही मर्यादा ठरवण्यात आली आहे. सरकारने मे २०२२ पासून उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांची सबसिडी सुरू केली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही सबसिडी वाढवून ३०० रुपये करण्यात आली आहे.

तसेच LPGच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असते. दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत गेल्या काही महिन्यांत वाढवण्यात आली असून ती ९४२ रुपयांपर्यंत झाली आहे. सबसिडी वजा केल्यानंतर सुद्धा उज्ज्वला लाभार्थ्यांना एका सिलिंडरसाठी ६४२ रुपये खर्च करावे लागत आहेत. मध्य पूर्वेतील वादामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या वाढलेल्या LPG च्या दरांचा परिणाम भारतावरही होत असल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT