PM Svanidhi Yojana Saam Tv
बिझनेस

PM Svanidhi Yojana: स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कर्ज; काय आहे पीएम स्वनिधी योजना?

PM Svanidhi Yojana Benefits: स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते.

Siddhi Hande

मोदी सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.यामध्ये अनेक योजनाअंतर्गत नागरिकांना आर्थिक मदत मिळते. तर अनेक योजनेअंतर्गत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. गरीब लोकांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवायज कर्ज देते.

पीएम स्वनिधी योजना ही रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.त्यानंतर विक्रेत्यांचे खीप हाल झाले. त्यामुळे पीएम स्वनिधी योजना सुरु केली.

पीएम स्वनिधी योजनेत सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना काम करण्यासाठी कर्ज देते. यामध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि फास्ट फूड स्टॉल चालवणाऱ्या लोकांना कर्ज दिले जाते.

केंद्र सरकार पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज देते. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला विश्वासार्हता निर्माण केली जाते. या योजनेत तुम्हाला सर्वप्रथम १०,००० रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची परतफेड केली तर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून देतात.

जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर चाटचे दुकान सुरु करायचे असेल तर त्यासाठी १०,००० रुपयांचे कर्ज दिले जाते. जर तुम्ही ही रक्कम वेळेवर परत केली तर तुम्हाला नंतर २०,००० रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यानंतर तिसऱ्यांदा ५० हजार रुपये दिले जातात.या योजनेत सरकार कर्जावर सबसिडीदेखील देते.

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही हमीची गरज नाही. या योजनेत घेतलेली रक्कम तुम्ही १ वर्षाच्या कालावधीत परत करु शकतात. दर महिन्याला हप्त्यांमध्ये ही रक्कम परत केली जाऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

SCROLL FOR NEXT