PM Surya Ghar Yojana Saam Tv
बिझनेस

PM Surya Ghar Yojana: ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज अन् ७८००० रुपयांची सबसिडी; केंद्र सरकारची योजना तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, या उद्देषाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम सुर्य घर मोफत वीज योजना. या योजनेअंतर्गत नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देता येते. यासाठी रुफटॉप बनवण्यासाठी सरकार अनुदानही देते. त्यामुळे रुफटॉप बसवण्यासाठी सबसिडी आणि मोफत वीज असे दोन्ही फायदे नागरिकांना मिळतात.

पीएम सुर्य घर योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता तुम्हाला योजनेचा लाभ घेतल्यानंतर सबसिडीसाठी फार वेळ वाट पाहावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त ७ दिवसांत सबसिडी मिळू शकते.

सध्या पीएम सुर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत सबसिडी मिळण्यासाठी एक महिन्याला कालावधी लागतो. मात्र, आता हा कालावधी कमी होणार आहे. आतापर्यंत पीएम सुर्य घर योजनेअंतर्गत १.३० कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. या लोकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देणे हा योजनेचा उद्देश आहे.

पीएम सुर्यघर योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जाते. हे सोलर पॅनल बसवण्यासाठीही तुम्हाला अनुदान दिले जाते. यामुळे तुमचे वीज बिल खूप कमी येते.

सोलर रुफटॉप बसवल्यानंतर सरकार काही दिवसांतच तुमच्या अकाउंटला सबसिडीचे पैसे ट्रान्सफर करते. जास्तीत जास्त सोलर पॅमल बसवण्यावर सरकारचा भर आहे. सरकार २ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवायचे असेल तर ३० हजार रुपये प्रति किलोवॅट पेसे देते. ३ किलोवॅटपर्यंत ४८ हजार रुपये आणि ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपये पैसे देते.

अर्ज कसा करायचा?

  • पीएम सुर्य घर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर रुफटॉप सोलरवर जाऊन अप्लाय करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्या आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.

  • यानंतर सोलर रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.Dicom कडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करु शकतात.

  • यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर कमिशनिंग रिपोर्ट सबमिट करा. आता तुम्हाला ७ दिवसांतच सबसिडी मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

SCROLL FOR NEXT