PM Suraksha Bima Yojana Saam Tv
बिझनेस

PM Suraksha Bima Yojana: वर्षाला २० रुपये भरा अन् २ लाखांचा लाभ मिळवा; पीएम सुरक्षा विमा योजना नक्की आहे तरी काय?

PM Suraksha Bima Yojana Benefits: केंद्र सरकारने नागरिकांसाठी पीएम सुरक्षा विमा योजना राबवली आहे. पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नागरिकांना १ किंवा २ लाखांचा विमा मिळतो.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना आर्थिक मदत मिळते. सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल याबद्दल कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम सुरक्षा विमा योजना राबवली आहे. पीएम सुरक्ष विमा योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त २० रुपये प्रिमियम भरावा लागतो.

पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती निधन किंवा दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत जर एखादी व्यक्ती दिव्यांग झाली तर त्यांना १ लाख रुपयांचा कवर मिळतो. १८ ते ७० वयोगटातील उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (PM Suraksha Bima Yojana)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येक वर्षात जून महिन्यात ऑटो डेबिट सुविधामार्फत २० रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल. या योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर दोन लाखांची आर्थिक मदत मिळते.

या योजनेत जर तुम्हाला प्रीमियम अकाउंट रिन्यू करायचे असेल आणि खात्यात बॅलेंस नसेल तर पॉलिसी रद्द होई शकते. या योजनेत ३१ मेआधी विमा पॉलिसी रिन्यू झाली की नाही हे चेक करावे. या योजनेत बँक खात्यात प्रिमियम अकाउंटमधून डेबिट होते. (PM Suraksha Bima Yojana News)

या योजनेत २०२३ पर्यंत २,०३०२.२६ कोटी रुपयांचे क्लेम देण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत लाखो लोकांनी लाभ घेतला आहे.पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना https://www.jansuraksha.gov.in या वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यात तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित कागदपत्रे तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन जमा करायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT