PM Mudra Yojana Saam Tv
बिझनेस

PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

PM Mudra Yojana: केंद्र सरकारने तरुणांसाठी खास पीएम मुद्रा योजना राबवली आहे. या योजनेत तरुणांना २० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कोणत्याही गॅरंटीशिवाय हे कर्ज दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम मुद्रा योजना

कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

तरुणांना व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळणार

केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. केंद्र सरकारने बिझनेस सुरु करण्यासाठी पीएम मुद्रा योजना सुरु केली आहे. पीएम मुद्रा योजनेत व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जेणेकरुन त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात.

केंद्र सरकारची पीएम मुद्रा स्कीम ही लोकप्रिय योजना आहे. या योजनेत याआधी १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जायचे. आता ही लिमिट १० लाखांनी वाढवण्यात आली आहे. आता २० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेत ४ टप्प्यांमध्ये पैसे दिले जाते.शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन व तरुण प्लस लोन दिले जाते. शिशु लोनमध्ये ५० हजारांपर्यंत लोन दिले जाते. किशोर लोनअंतर्गत ५० हजार ते ५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते. तरुण लोनअंतर्गत ५ ते १० लाखांचे कर्ज दिले जाते. नवीन तरुण प्लस कॅटेगरीत १० ते २० लाखांचे कर्ज दिले जाते.

तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय हे कर्ज दिले जाणार आहे. या योजनेत लोनसाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग चार्ज घेतले जाणार आहे.

पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली आहे. कोणतेही नॉन कॉर्पोरेट आणि नॉन अॅग्रीकल्चर बिझनेस सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेत १८ वर्षांवरील कोणीही अर्ज करु शकतात. या योजेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, केवायसी आणि उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT