PM Mudra Yojana Saam Tv
बिझनेस

PM Mudra Yojana : तरुणांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज; असा मिळवता येईल लाभ

PM Mudra Yojana To Start Business: केंद्र सरकारने तरुणांसाठी पीएम मुद्रा योजना राबवली आहे. स्वतः चा व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांना आर्थिक मदत म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पीएम मुद्रा योजना.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते आहे. याआधी फक्त १० लाख रुपये लोन दिले जायचे. आता २० लाख रुपये लोन दिले जात आहे. मात्र, यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोण आणि कसा घेता येईल.

पीएम मुद्रा योजना

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी लोन दिले जाते. खूप कमी व्याजदरावर हे लोन दिले जाते. यामध्ये तरुणांना ५०,००० ते अगदी २० लाखांपर्यंतचे लोन दिले जाते.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला या योजनेतील कर्जावर १० ते १२ टक्के व्याज द्यावे लागते.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. हे २० लाख रुपयांचे लोन फक्त त्याच तरुणांना मिळणार आहे ज्यांनी याआधी लोन घेऊन ते पूर्णपणे फेडले आहे. त्यानंतरच त्यांना हे लोन दिले जाणार आहे.

या योजनेत तीन प्रकारे लोन दिले जाते. यामध्ये ५०,००० रुपयांचे लोन दिले जाते. त्यानंतर ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. यानंतर ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत लोन दिले जाते. आता ही लिमिट वाढवून २० लाख केली आहे. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. अर्जदाराचा बँकेतील रेकॉर्ड चांगला हवा. त्याचसोबत त्याच्याकडे कौशल्य आणि कामाचा अनुभव असायला हवा.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा

सर्वप्रथम तुम्हाला www.mudra.org.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला शिशु, किशोर आणि तरुण लोन असे पर्याय दिसतील.

बिझनेस लोनसाठी तरुण लोन या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर फॉर्म डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढा. हा फॉर्म व्यवस्थित भरा.

फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची कॉपी त्यासोबत जोडा.

यानंतर तुमचा फॉर्म बँकेत जाऊन सबमिट करा.

बँकेत तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT