PM Mudra Scheme Saam Tv
बिझनेस

PM Mudra Scheme: आता बिनधास्त सुरु करा स्वतः चा व्यवसाय; सरकार देतंय २० लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

PM Mudra Scheme For Business: सरकारने स्वतः चा व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांसाठी खास योजना राबवली आहे. सरकार पीएम मुद्रा योजनेेअंतर्गत २० लाखांचे कर्ज देते.

Siddhi Hande

अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे भांडवल असते. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करु शकतात. यासाठीच सरकारने एक खास योजना राबवली आहे. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांचे कर्ज दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत देशातील लहान व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते. नॉन अॅग्रीकल्चर सेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला १० लाखांचे कर्ज दिले जायचे. आता या योजनेत २० लाखांपर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते.

यंदाच्या बजेटमध्ये कर्जाची हही रक्कम वाढवण्यात आली होती. निर्मला सितारामन यांनी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा १० लाखांहून २० लाख करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता ज्या लोकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.

या योजनेअंतर्गत आधी १० लाखांचे कर्ज दिले जायचे आता २० लाखांपर्यंत दिले जाते. या योजनेत तीन कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन, आणि तरुण लोन. सर्वप्रथम शिशु लोनमध्ये ५० हजारांचे लोन दिले जाते. यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नसते. त्यानंतर ५० ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यानंतर ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. या योजनेत तुम्हाला ९ ते १२ टक्के व्याज द्यावे लागते. या योजनेत लहान दुकानदार, फूड प्रोसेसिंग युनिट असे लहान व्यवसाय सुरु करण्यासाठीी प्रोत्साहन दिले जाते. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेत अर्ज करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT