PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana : बँक खात्यात ₹ २००० आले नाहीत? शेतकऱ्यांनो अशी करा तक्रार, खटाखट पैसे जमा होतील

PM Kisan Yojana 19th Installment: पीएम किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही तक्रार करु शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. काल २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटला २००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले आहे. सरकारने २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले आहे.

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. या योजनेत बिहारमधील सर्वाधिक ७६००० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये २००० रुपये जमा झाले का? जर अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्ही तक्रार करु शकतात.

पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला आलेला नाही?

पीएम किसान योजनेत १९ वा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करु शकतात. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत केवायसी केलेली नाही त्यांचे पैसे कदाचित येणार नाहीत.या योजनेत जर लाभार्थ्यांमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करु शकतात.

पीएम किसान योजनेचा हप्ता न आल्यास तक्रार कुठे करायची?

पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र आहात तरीही तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्ही तक्रार करु शकतात. तुम्ही pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in या वेबसाइटवर जाऊन तुमची स्थिती सांगू शकतात. याचसोबत तुम्ही 011-24300606 किंवा 155261 या नंबरवर कॉल करु शकतात.याचसोबत पीएम किसानच्या टीमशी संपर्क साधण्यासाठी 1800-115-526 या नंबरशी संपर्क करु शकतात.

वेबसाइटवर जाऊन चेक करा

तुम्ही https://pmkisan.gov.in/या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करायचे आहे. यानंतर आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT