PM Kisan Yojana: २४ फेब्रुवारीपर्यंत हे काम नक्की करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचे २००० रुपये; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana E KYC Process: पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे. पीएम सन्मान निधीचा हा १९वा हप्ता असणार आहे. याआधी एकूण १८ हप्ते देण्यात आले आहे. पीएम किसान सन्मान निधीत वर्षाला ६००० रुपये दिले जातात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: १३ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला जमा होणार

दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये हे ६००० रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. यामागचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. दरम्यान या योजनेत तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळणार की नाही याबाबत माहिती अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीएम किसान योजनेत २००० रुपये २४ फेब्रुवारीला दिले जाणार आहेत. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. याबाबत तुमच्या हप्त्याची माहिती वेबसाइटवर दिली आहे.

लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा

लाभार्थ्यांमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करु शकतात.

सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचं आहे.

यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा.

यानंतर तुमचा अकाउंट नंबर, बँक अकाउंट नंबर टाका.

यानंतर Get data वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या स्क्रिनवर पेमेंटची सर्व माहिती दिसेल.

जर तुमचे या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती मिळवू शकतात.

PM Kisan Yojana
Atal Pension Scheme: जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा

केवायसी गरजेचे

तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.यासाठी तुम्ही ओटीपी बेस्ड केवायसी करु शकतात. फेस ऑथेंटिकेशन बेस्ड केवायसी करु शकतात. बायोमॅट्रिक बेस्ड केवायसी करु शकतात.

PM Kisan Yojana
PPF Scheme: रोज १०० रुपये जमा करा अन् १० लाख कमवा; PPF योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा; जाणून घ्या कॅलक्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com