PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan Yojana 23rd Installment Date: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, त्याआधीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या शेतकऱ्यांना कधीच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हप्ते दिले गेले आहेत. शेतकऱ्यांना २३वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोणत्या महिन्यात पैसे जमा केले जाणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत आता अपडेट समोर आली आहे.

पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 23rd Installment Update)

पीएम किसान योजनेत ल३ वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. दर ४ महिन्यांनी पैसे दिले जातात.शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या दृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना २२वा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर मिडिया रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांना जुलै महिन्यात पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता दिला जाऊ शकतो. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मार्चनंतर ४ महिन्यांनी पैसे दिले जातील.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ (These Farmers will Not Get PM Kisan Yojana Installment)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत तुमच्याकडे फार्मर आयडी असायला हवे. तुम्ही केवायसी केलेले असावे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी याआधी कोणत्याही पदावर काम केले असेल. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विभागात काम केले असेल. तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु शेतकरी एमटीएम, क्लास ४ आणि क्लास डी पदावर काम करत असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

जर शेतकऱ्यांना १०,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. एखादी व्यक्ती जर कर भरत असेल तर त्यांनाही पैसे मिळणार नाही. शेतकरी जर डॉक्टर, वकील, सीए या पदावर काम करत असतील तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

New Labour Law: तुमचा पगार वाढणार की कमी होणार? नवीन कामगार कायद्याचा कर प्रणालीवर होणार परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT