PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार? समोर आली अपडेट

PM Kisan Yojana Next Installment: पीएम किसान योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु हा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?

ऑक्टोबरमध्ये पैसे मिळण्याची शक्यता

दिवाळीमध्ये खुशखबर येण्याची शक्यता

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कोट्यवधी लोक हे शेती करतात. ते शेतीवर अवलंबून आहेत. दरम्यान, याच शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारने काही योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. पीएम किसान योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतात.

दिवाळीत शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते

पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा करतात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत या योजनेत एकूण २० हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता २१वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते.

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता दिवाळीआधी मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जुलैचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलैचा हप्ता हा ऑगस्टमध्ये देण्यात आला होता.

ऑक्टोबरमध्ये पैसे येण्याची शक्यता

दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.त्यामुळे हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता आधीचा हप्ता २ महिने उशिरा आला त्यामुळे हा हप्तादेखील उशिरा येऊ शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्येदेखील पैसे येऊ शकतात. याचसोबत सणासुदीच्या काळात पैसे जमा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे या योजनेचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

SCROLL FOR NEXT