PM Kisan 24th Installment google
बिझनेस

PM Kisan Yojana : ... तर या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता, महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ऑक्टोबर २०२६ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण केली नसतील तर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतातल्या अनेक शेतऱ्यांना मदत मिळाली म्हणून सरकार अनेक योजना राबवत असतं. त्यातलीच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेचा २३ वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यातच आनंदाची बातमी म्हणजे, आता २४ वा हप्ता जाहीर केला जाणार आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाणार याबद्दल पुढील माहितीत जाणून घेऊयात.

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना ६००० हजार रुपयांची मदत केली जाते. हे पैसे ३ हप्त्यामध्ये दिले जातात. ज्यात २००० हप्ता ४-४ महिन्यांच्या अंतराने खात्यात जमा केले जातात. पण आत्ता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं तसेच योजनेसंबंधी अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला याचा हप्ता दिला जाणार नाही.

२४ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचे आत्तापर्यंत २३ हप्ते जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून याचा फायदा झाला आहे. २० जून २०२६ रोजी २३ वा हप्ता जाहीर केला गेला. तर आता पुढील हप्ता हा ४ महिन्यांनी दिला जातो. तर २३ व्या हप्त्यानुसार २४ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात पाठवला जाईल. आत्तापर्यंत यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२४ वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही?

पीएम किसान योजनेसाठी जो पात्र शेतकरी असेल त्यालाच लाभ मिळणार आहे. अपात्र शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करतात पण त्यांचा अर्ज रद्द केला जातो. तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी योजनेसंबंधी काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजेत. अन्यथा पात्र असूनही त्यांना लाभ मिळू शकत नाही. त्यामध्ये ई - केवायसी पूर्ण करणे, सातबाऱ्याचा पुरावा असणे, आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य असेल. ही कामं पूर्ण केली नाहीत की तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT