PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पती-पत्नीलाही लाभ मिळणार? पुढचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना जूनमध्ये २०वा हप्ता दिला जाऊ शकतो. या योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

भारत देश हा कृषीप्रधान आहे. भारतात सर्वाधिक लोक हे शेती करतात. शेतीवर अनेकांचे जीवन अवलंबून आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत देणे खूप गरजेचे असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना(PM Kisan Yojana) राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात.

पीएम किसन सन्मान निधी योजनेत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आतापर्यंत १९ हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता २०वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता शेतकरी पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.

भारत सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.१९ वा हप्ता २५ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, आता जून महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. १८वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात जमा केला होता. त्यानंतर १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होता.

पती पत्नी दोघांनाही मिळणार लाभ?

या योजनेत शेतकरी पती-पत्नी या दोघांनाही योजनेचा लाभ घेता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, या योजनेत पती आणि पत्नी अशा दोघांनाही लाभ मिळत नाही. या योजनेत कोणत्याही कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर पतीचे नाव रजिस्टर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर पत्नीचे नाव रजिस्टर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT