PM Kisan Yojana 25th Installment: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारने आधार म्हणून सरकारने ५००० रुपयांची मदत केली. तसेच शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार विविध योजना राबवत आहे. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे. या योजनेच्या २५ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहतायेत.
यामध्ये वर्षाला ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी २४ वा हप्ता जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण २५ वा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा पात्र असूनही तुमचे पैसे अडकू शकतात.
सर्वात आधी Beneficiary Status तपासा. यामध्ये तुमची पात्रता, पेमेंट आणि व्हेरिफिकेशनची माहिती मिळेल. यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवरील Farmers Corner मध्ये जाऊन Know Your Status हा ऑप्शन निवडा. तसेच e-KYC ची प्रोसेस पूर्ण करा. तुम्ही वेबसाइटवर किंवा पीएम किसान अॅपवरच्या फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने करता येते. जवळच्या CSC केंद्रावरही बायोमेट्रिक पद्धतीने ईकेवायसी करता येते.
तुमच्या जमिनीची सरकारी नोंद आणि पडताळणी पूर्ण झालीये का, हे वेळीच तपासून घ्या. Land Seeding समोर No दिसत असेल तर संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. लक्षात घ्या की पीएम किसानचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे तुमचे बँक खातं आधारशी लिंक असणं आणि NPCI मॅपिंग पूर्ण असणं गरजेचं आहे.
तुमच्या बँक खात्यात Direct Benefit Transfer (DBT) च्या मदतीने पैसे स्वीकारण्याची सुविधा सुरू आहे का, याची खात्री करा. तसेच जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदी किंवा इतर कागदपत्रांमध्ये चुका असतील तर त्या वेळेत दुरुस्त करून घ्या. जर एकाच कुटुंबातले अनेक सदस्य लाभ घेत असतील किंवा योजनेच्या नियमांनुसार अपात्रता लागू होते का, याची पडताळणी होऊ शकते. त्यामुळे आपली लाभार्थी माहिती अचूक ठेवा.
पीएम किसान योजनेचा २५ वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च २०२७ मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण केंद्र सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहताना वरील सात कामं पूर्ण करून ठेवावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.