PM Kisan Yojana google
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पुढील आठवड्यात खात्यात थेट ४००० रुपये येणार; यादीत तुमचे नाव आहे का?

PM Kisan Next Installment : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जास्त मिळावी म्हणून पीएम किसान योजनेमध्ये काही बदल केला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारकडून देशातल्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आता पुढील हप्त्याची तयारी सुरू असताना काही शेतकऱ्यांना नेहमीच्या २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. पण हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांचा मागचा हप्ता काही कारणांमुळे रखडला होता आणि आता त्यांनी आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसी किंवा इतर त्रुटी दुरुस्त केल्या आहेत, त्यांना मागची थकीत हप्ता आणि नवीन हप्ता एकत्र मिळू शकतो. त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४ हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

हे ३ कामे पूर्ण असणे महत्त्वाचे

पुढील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम e-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर जमिनीची नोंद आणि लाभार्थ्याच्या खात्याशी संबंधित Land Seeding प्रक्रिया पूर्ण झालेली असावी. याशिवाय शेतकऱ्यांचे बँक खातं आधारशी लिंक असणं आणि त्यावर DBT म्हणजेच Direct Benefit Transfer सुविधा सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यावर हप्ता रखडू शकतो.

लाभार्थी स्टेटस असे तपासा

शेतकऱ्यांना आपला हप्ता आणि लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. तिथे Farmers Corner मध्ये जाऊन Know Your Status हा पर्याय निवडावा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकून स्टेटस तपासता येईल.

स्टेटसमध्ये e-KYC, Land Seeding आणि आधार बँक सीडिंग यासमोर येस आहे की नाही, हे तपासा. सर्व प्रोसेस पूर्ण असल्यास पुढचा हप्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: नेपाळच्या पुरामध्ये 4 हजार कोटी वर्षे जुना शाळीग्राम सापडला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मोठी गॅस गळती; वाहतूक बंद, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सत्ताधारी भाजपनं कोअर कमिटीच बदलली; पक्षनेत्यांची उचलबांगडी, नेमकं काय घडलं?

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठं यश, सरकारनं धडाधड GR काढले; 17 दिवसांनी आंदोलन मागे

पुण्यात डीजेवरून राजकारण तापलं; DJ मुक्त पुण्याला गणेश मंडळांचाच विरोध

SCROLL FOR NEXT