PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

PM Kisan Yojana 21st Installment: पीएम किसान योजनेच्या हप्त्याची कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेत तुम्हाला पैसे येणार की नाही याचा स्टेट्स अशा पद्धतीने करा चेक.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार?

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार २००० रुपये

पीएम किसान योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा?

पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. शेतकऱ्यांना तीन वेळा प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २० हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर २१वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे येणार की नाही याचा स्टेट्‍स तुम्ही चेक करा.

कधी येणार २१वा हप्ता? (PM Kisan Yojana 21st Installment Date)

पीएम किसान योजनेत २०वा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात २१वा हप्ता येण्याची अपेक्षा होती.मात्र, अजूनही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. दिवाळीआधी शेतकऱ्यांना पैसे येतील, अशी आशा होती. मात्र, शेतकऱ्यांनी पैसे न आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हा निधीचे वाटप करता येणार नाही. त्यामुळे त्याआधीच पैसे दिले जातील.

या शेतकऱ्यांना मिळणार २१वा हप्ता

पीएम किसान योजनेत फक्त ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच योजनाचा लाभ मिळणार आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी पूर्ण करु शकतात.

२१ वा हप्त्याचा स्टेट्‍स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला होमपेजवर ‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary Status’ असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

यानंतर Get Data यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्टेट्‍स कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT