PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: या राज्यात पीएम किसानचा हप्ता आधीच वितरित; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ₹२००० कधी मिळणार?

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. काही राज्यातील शेतकऱ्यांना याआधीच पैसे देण्यात आले आहेत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची बातमी

या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच मिळाले ₹२०००

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार पीएम किसानचा हप्ता?

देशातील जवळपास ९.७ कोटी शेतकरी पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारचा २१वा हप्ता कधी येणार असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. दरम्यान, अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत. इतर राज्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच मिळाले ₹२०००

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता पूरग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना आधीच गेला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता दिला होता. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही ७ ऑक्टोबर रोजी २००० रुपये देण्यात आले होते. यानंतर इतर राज्यातील शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतिक्षा आहे.

कधी येणार पीएम किसानचा हप्ता?

पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात दिला जाण्याची शक्यता आहे. हा हप्ता ऑक्टोबरमध्येच शेतकऱ्यांना मिळायला हवा होता. परंतु हा हप्ता लांबणीवर गेला. त्यानंतर आता शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपये दिले जातील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तेव्हाच पैसे मिळतील. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. परंतु त्याआधी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे.

कोणाला मिळणार पीएम किसानचा हप्ता?

ज्या शेतकऱ्यांना याआधीचा हप्ता मिळाला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु त्याआधी शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत केवायसी करायची आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT