PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जमा; या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये; तुम्ही आहात का? जाणून घ्या

PM Kisan Yojana 19th Installment: पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही २००० रुपये जमा झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांना पैसे मिळाले नाहीत.

Siddhi Hande

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील कोट्यवधी शेतकरी लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. ३ हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना नुकताच १९ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता जमा करण्यात आला आहे. जवळपास ९.७ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत वेगवेगळ्या राज्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांना नियमांबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

पीएम किसान सन्मान योजनेत २१५०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेत सर्वाधिक लाभार्थी हे बिहारचे शेतकरी आहेत.या योजनेत तुम्हाला दर तीन महिन्यांनी केवायसी करायचे असते. केवायसी केले तरच पैसे अकाउंटला जमा होतात. यावेळीदेखील अनेक शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा न झाल्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांना पैसे मिळाले नाही. मात्र, याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT