PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता महिनाभरात येणार, ६ हजार रुपये मिळवायचे असतील तर 'हे' काम आजच करा!

PM Kisan Yojana 18th Installment: पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर हे काम आजच पूर्ण करा.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. पीएम सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.या योजनेत शेतकऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या जमा केले जाणार आहेत. या योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत अनेक शेतकऱ्यांचे चुकीचे फोन नंबर रजिस्टर झाले आहेत. चुकीचे नंबर दुरुस्त करुन घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे असतील त्यांनी लगेचच बदलून घ्यावेत. पीएम किसान योजनेत एकच नंबर अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट करुन घ्या. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करु शकतात. यासोबत केवायसी करणे गरजेचे आहे.

पीएम किसान योजनेत ई केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.ई केवायसी करण्याची प्रोसेस जाणून घ्या.

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

  • होम पेजवर Farmers Corner या सेक्शनमध्ये जाऊन eKYC चा ऑप्शन निवजडा.

  • यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका.

  • यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

  • यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT