PM-Kisan Samman Nidhi yojana 23rd Installment : देशभरातील लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-Kisan) मोठी आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Nidhi 23rd Installment) प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रूपयांची आर्थिक मदत केली जातेच. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रूपये मदतनिधी दिला जातो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रूपयांची आर्थिक मदत मिळते. वर्षातून ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केली जाते. १३ मार्च रोजी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत २२ वा हप्ता जमा झाला होता. आता २३ वा हप्ता कधी येणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रूपयांची मदत जमा केली जाते. प्रत्येक हप्त्याला केंद्र सरकारकडून २ हजार आणि राज्य सरकारकडून २ हजार रूपये मदत दिली जाते. राज्यातील सर्व शेतकरी आता २३ व्या हप्त्यांकडे डोळे लावून बसले आहेत. पण हा हप्ता खात्यावर येण्याआधी बळीराजाला महत्त्वाचे काम करावेच लागणार आहे, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता जमा होणारच नाही.
तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार
फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ईकेवायसी करावीच लागणार आहे. जर आतापर्यंत ईकेवायसी केली नसेल, तर तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही. त्याशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणेही अनिवार्य आहे. तसेच तुमच्या नावावर असणाऱ्या जमिनीची माहिती देणेही अनिवार्य आहे. या ३ गोष्टी केल्या तरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हप्ता जमा होणार आहे. तुम्ही ईकेवायसी अद्याप केली नसेल तर तात्काळ करून घ्यावी. अथवा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करावेत.
ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचे नाव सरकारी नोंदणीकृत आहेत. याव्यतिरिक्त कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा अथवा उच्च पदावर नसावा. हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी सर्व कागदपत्रे अचूक आणि अद्ययावत असणे अनिवार्य आहे. सरकारी आकडेवारीनुसार योजनेच्या २२ व्या हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांना एकूण ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
१३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता जमा झाला होता. प्रत्येक चार महिन्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा होतो. म्हणजेच, आता पुढील हप्ता जुलै अथवा ऑगस्ट २०२६ मध्ये शेतकर्यांच्या खात्यावर येईल असा अंदाज आहे. पीएम किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.