PM Kisan Mandhan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Mandhan Yojana: या शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार ३००० रुपये; तुम्हीही पात्र आहात का? वाचा सविस्तर

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शेतकऱ्यांचे भविष्य आर्थिकदृया सुरक्षित व्हावे, त्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते.

गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवली आहे. या योजनेतील ही पेन्शन शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर मिळते. कोणत्याही संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. परंतु शेतकऱ्यांना अशी पेन्शन मिळत नाही. त्यामुळे पीएम किसान मानधन योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेचे वैशिष्ट्य (PM Kisan Mandhan Yojana)

या योजनेत त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे. ज्यांना म्हातारपणात कोणतीही साथ नसते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी फार पूर्वीपासून थोडी थोडी रक्कम जमा करावी. त्यानंतर वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन स्वरुपात हे पैसे दिले जातील.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (Eligibility Of PM Kisan Mandhan Yojana)

या योजनेचा लाभ फक्त १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर शेतकऱ्याचे उत्पन्न १५००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि इन्कम टॅक्स देत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

शेतकऱ्यांनी आपल्या वयानुसार दर महिन्याला ५५ ते २०० रुपयांची गुंतवणूक करायची आहे. जर कोणी १८ वर्षांचे असेल तर त्यांना महिन्याला ५५ रुपये द्यावे लागणार आहे. ४० वर्षांच्या वयोगटातील शेतकऱ्यांना दर महिन्याला २०० रुपये द्यावे लागणार आहे. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात. त्याच निधीमधून हे पैसे कट केले जातात.

अर्ज कसा करावा? (How To Apply For Scheme)

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल. याचसोबत आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागेल. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात हाणामारी करणारा पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेची वाजतगाजत मिरवणूक|VIDEO

Moong Dal Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली तर, झटपट बनवा खमंग मूग डाळ हलवा

Hair Fall: केस गळताहेत? तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नापणे धबधब्यावर लोकार्पण

SCROLL FOR NEXT