Government Scheme For Farmer Saam Tv
बिझनेस

Government Scheme: शेतकऱ्यांना पेन्शन, दर महिन्याला मिळतात ३००० रुपये; कसे ते जाणून घ्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Kisan Mandhan Yojana Farmers Get 3 Thousand Rupees Per Month:

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला काही आर्थिक मदत मिळते. त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना.

पीएम किसान मानधान योजने ही अल्प आणि अत्यलप भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षांनंतर घरी असलेल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत जर कोणत्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पेन्शनची ५० टक्के रक्कम मिळते. (Latest News)

ही पेन्शन फक्त पती आणि पत्नीसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे मुलांना मिळत नाहीत. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.

पीएम किसान मानधन योजना

पीएम किसान मानधन योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देते. यामध्ये वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतर तुम्हाला दरमहिना ३ हजार रुपये मिळेल. एका वर्षात तुम्हाला ३६ हजार रुपये मिळतील. या योजनेत शेतकऱ्याच्या वयानुसार पैसे जमा करावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. हे पैसे शेतकऱ्याच्या वयाच्या आधारावर जमा करावे लागतात. जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के म्हणजेच महिन्याला १५०० रुपये मिळतील. आतापर्यंत या योजनेत तब्बल १९.४७,५८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याबाबत मनी कंट्रोलने अहवाल दिला आहे.

तुम्हालाही जर पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमी आहे. तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT