तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच महिन्यांपासून शेतकरी २४ व्या हप्त्याची वाट पाहतायेत, याबाबतच मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २४ वा २००० रुपयांचा हप्ता हा ऑक्टोबर २०२६ मध्ये जाहीर केला जाईल. मात्र सरकारने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT)च्या माध्यमातून पाठवला जातो. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी २००० रुपये जमा केले जातात. वर्षाला एकूण ६००० रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते.
पीएम किसान योजनेचा हप्ता हा एप्रिल - मे, ऑगस्ट - नोव्हेंबर आणि डिसेंबर - मार्च या कालावधीत खात्यात वितरित केला जातो. त्यामुळे या महिन्यात पीएम किसानचा २४ वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. याआधी २३ वा हप्ता जूनमध्ये पाठवण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांनी e-KYC करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. ही केवायसी तुम्ही ३ पद्धतीने करू शकता. पीएम किसान योजनेची वेबसाइटवर आधार कार्ड आणि OTP च्या मदतीने e-KYC पूर्ण करता येते.
त्याशिवाय तुम्ही जवळच्या CSC किंवा सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक CSCe-KYC सुद्धा करू शकता. पीएम किसान मोबाईल अॅप आणि आधार फेस RD अॅपच्या मदतीने फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने घरबसल्या e-KYC करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.