PM Kisan Yojana meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा ₹2000 चा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. २३ वा हा जूनमध्ये मिळाल्याने ऑक्टोबरमध्ये २४ वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठराविक कालावधीनंतर आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहतायेत.

आतापर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खातात

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ वा जाहीर करण्यात आला होता. या हप्त्याचा लाभ सुमारे ९ कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळाला.

२४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येणार?

पीएम किसान योजनेचा हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. २३ वा हप्ता जूनमध्ये मिळाल्यामुळे चार महिन्यांनंतर कालावधी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतो. त्यामुळे २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र २४ व्या हप्त्याची निश्चित तारीख केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे.

DBTने थेट खात्यात हप्ता जमा

पीएम किसान योजनेतल्या आर्थिक मदतीची रक्कम Direct Benefit Transfer (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पाठवली जाते. त्यामुळे या प्रक्रियेत बँकेत फेऱ्या मारण्याची गरज राहत नाही आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून पाठवलेली रक्कम थेट मिळते.

शेतकऱ्यांनी हप्ता मिळण्याआधी आपली पात्रता बँक खातं आणि योजनेशी संबंधित आवश्यक तपशील अपडेट आहे की नाही, हे तपासून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर त्याबद्दलची माहिती स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT