PM Kisan Samman Nidhi Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकार 'या' दिवशी 14व्या हप्त्याची रक्कम पाठवणार खात्यात

PM Kisan Samman Nidhi 14 installment 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकार 'या' दिवशी 14व्या हप्त्याची रक्कम पाठवणार खात्यात

साम टिव्ही ब्युरो

PM Kisan Yojana 14th Installment: मोदी सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना खुशखबर देऊ शकते. केंद्र सरकार किसान सन्मान निधी योजना (Kisan Samman Nidhi Yojana) देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी चालवत आहे.

या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 13व्या हप्त्यापर्यंत (PM Kisan 13th Installment) लाभ मिळाला आहे. आता शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. (Utility News in Marathi)

पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते, अशी माहिती मिळत आहे. शेवटचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी 14 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात. (Latest Marathi News)

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये केले जाणार ट्रान्सफर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी खरनाल, नागौर येथे एका कार्यक्रमादरम्यान किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता जारी करू शकतात. याद्वारे देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जातील. मात्र,याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. मात्र सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये एकाच वेळी देत ​​नाही, तर 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT