घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. या दोन्ही हप्त्यांच्या निधी वितरणाबद्दल महत्त्वाची तरतूद करण्यात आली. त्यामुळे घराचं बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 मध्ये वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी म्हणजेच Beneficiary Led Construction (BLC) या घटकांमध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रासाठी SLS Code – MH 688 अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याच्या निधी वितरणाची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे घरकुल बांधकामासाठी मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना पुढच्या टप्प्यातल्या आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या निधीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समकक्ष हिस्स्याचा समावेश आहे.
तर या निधी वितरणामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जाती प्रवर्गातल्या लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलाय.
सर्वसाधारण प्रवर्ग: अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाव्यतिरिक्त इतर पात्र लाभार्थ्यांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्याची तरतूद आहे.
अनुसूचित जाती प्रवर्ग: SC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीही दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे दोन्ही घटकातल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणायला मदत होणार आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याच्या निधी वितरणाबद्दल तरतूद करण्यात आली असली, तरी प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची तारीख ठरलेली नाही. प्रत्यक्ष निधी वितरण संबंधित प्रशासकीय प्रक्रियेनुसार होणार आहे. त्यामुळे पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या महानगरपालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे संपर्क साधून हप्त्याच्या वितरणाची माहिती घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.