PM Awas Yojana Saam Tv
बिझनेस

PM Awas Yojana: तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सरकार करतंय इतक्या लाखांची मदत;असा घेता येईल लाभ

PM Awas Yojana Application Process: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकांना स्वतः चे हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकांचे स्वतः चे हक्काचे घर असावे या उद्देशातून प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली आहे. ३ कोटी लोकांना या योजनेतून घर बनवण्यासाठी मदत करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. मागील दहा वर्षात जवळपास ४.२१ कोटी घरे बनवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय ते जाणून घेऊया.

पीएम आवास योजनेअंतर्गत सरकार गरीब नागरिकांना घररे बांधण्यासाठी मदत करते. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रकार

प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन प्रकार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वेगवेगळी योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशा दोन योजने सुरु करण्यात आल्या आहेत.

पीएम आवास योजनेचे फायदे

  • ज्या नागरिकांकडे स्वतः चे हक्काचे घर नाहीत ते लोक पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • जर एखाद्या व्यक्तीकडे जमीन आहे परंतु घर बांधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. अशा लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

  • या योजनेअंतर्गत होम लोनवर सब्सिडी देण्यात येते. ही सब्सिडी नागरिकांच्या उत्पन्नावर आधारित असते.

  • या योजनेअंतर्गत बँकाना कमी व्याजदरावर लोन देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

पात्रता

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

  • प्रधानमंत्री योजनेअंतर्गत १८ लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना मदत केली जाते.

  • योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतः चे पक्के घर नसावे.

  • परिवारातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. EWS प्रवर्गातील नागरिकांचे उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे.

अर्ज कसा करावा

या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) येथे जावे लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://pmayg.nic.in या वेबसाइटवरुन अर्ज करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT