ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भाद्रपद महिन्याला सुरुवात होताच अनेकांच्या घरी गणरायाच्या आगमनाची तयारी होते.
घरामध्ये गणरायाची स्थापना केल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होतं.
गणपती बाप्पाची प्रानप्रतिष्ठा करण्यापूर्वी या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
गणेश चतुर्थीला तुमच्या घरातील मंदिर सजवण्यासाठी पिवळ्या कपड्याचा वापर करा.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरातील मंदिर सजवण्यासाठी तुम्ही केळीच्या पानांचा वापर करू शकता.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरातील मंदिरामध्ये जास्वंद, झेंडू आणि गुलाबाच्या फुलांनी सजवा.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी दुर्वाचा वापर करणं शुभ मानलं जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.