Pink Rickshaw Yojana  Saam Tv
बिझनेस

Pink Rickshaw Yojana: १० हजार महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा, कसा करायचं अर्ज? पूर्ण माहिती !

What Is Pink Rikshaw Yojana: महिलांसाठी राज्य सरकारने पिंक रिक्षा योजना राबवली आहे. पिंक रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा देण्यात येते.

Siddhi Hande

सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे लाडकी बहीण आणि पिंक रिक्षा योजना सुरु केली आहे. या दोन्ही योजनांमधून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मदत केली जाते. महिला स्वतः च्या पायावर उभ्या राहाव्यात. त्यांनी स्वतः रोजगार निर्माण करावा, या उद्देशातून गुलाबी रिक्षा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला स्वतः रिक्षा चालवू शकणार आहेत. त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.

पिंक रिक्षा योजना ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे. गरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योनेअंतर्गत महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे.

पिंक रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील १७ शहरातील १० हजार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. पिंक रिक्षाची विकत घेण्यासाठी २० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. १० टक्के रक्कम अर्जदारांना भरावी लागणार आहे. त्यानंतर उरलेली ७० टक्के रक्कम ही महिला बँक लोनच्या माध्यमातून भरु शकतात.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?

महाराष्ट्राच्या रहिवासी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या महिलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावादेखील महिलांकडे असायला हवा. महिलांकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT