PIB Fact Check  saam TV (AI)
बिझनेस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज देणारी केंद्र सरकारची योजना असल्याचा दावा व्हायरल आहे. PIB Fact Check ने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. जाणून घ्या संपूर्ण सत्य.

Namdeo Kumbhar

PIB Fact Check : केंद्र सरकार 'प्रधानमंत्री लोन योजने'अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आधार कार्डवर ३ लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा एका व्हिडीओतून केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा मेसेज किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तर आताच सावध व्हा. सरकारकडून यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

PIB ने केला खुलासा

आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज दिले जाते, या व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या 'PIB Fact Check' (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) ने तपास केला. पीआयबीने स्पष्ट केले आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट (Fake) आहे. आशा दाव्यावर विश्वास ठेवू नये. तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहेत.

पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये नेमकं काय म्हटले?

आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज दिले जाते, अशा प्रकारची कोणतीही सरकारी योजना केंद्र सरकारकडून चालवली जात नाही.

फक्त आधार कार्डवर ३ लाख रुपये देण्याचे आश्वासन देणारे सर्व मेसेज आणि व्हिडिओ लोकांची फसवणूक करणारे आहेत. त्यामुळे अशा मेसेज अथवा व्हिडीओ आला तर सावध राहा..कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

सरकारचे आवाहन

अशा कोणत्याही खोट्या योजनांच्या जाळ्यात नागरिक अडकू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे. केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेची अधिकृत आणि खरी माहिती हवी असल्यास, केवळ सरकारी संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा. तुम्हालाही असा कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास त्याला बळी पडू नका आणि कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा पैसे अनोळखी व्यक्तीला देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनाचे आयोजन

राजकीय भूकंप! 3 माजी मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Black Pepper Benefits For Irregular Periods : दर महिन्याला मासिक पाळी येत नसेल तर काळ्या मिरीचा सोपा उपाय करून पाहा, आराम मिळेल

Entertainment News : ब्रेकअपनंतर युट्युबर अडकणार लग्नाच्या बेडीत! मदीनेत पार पडणार निकाह; होणाऱ्या बायकोचा फोटो आला समोर

Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

SCROLL FOR NEXT